Our Projects

सीएचबी प्राध्यापकाच्या मानधनात ३ पट वाढ

शासन निर्णय:

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितीतील उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/ संस्था तसेच अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अभ्यागत/ तासिका तत्वावरील अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाच्या दरात या शासन निर्णयान्वये पुढीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे.

मानधनवाढ तक्ता (सुधारित दर):

अ. क्र. अभ्यासक्रमाचा प्रकार दि. २२/१०/२०२१ नुसार प्रति तास दर (सैद्धांतिक | प्रात्यक्षिके) सुधारित दर प्रति तासाकरिता (सैद्धांतिक | प्रात्यक्षिके)
कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) रु. ६२५/- | रु. २५०/- रु. ९००/- | रु. ३५०/-
कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) रु. ७५०/- | रु. ३००/- रु. १,०००/- | रु. ४५०/-
शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण (पदवी/ पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) रु. ७५०/- | रु. ३००/- रु. १,०००/- | रु. ४५०/-
विधी (पदवी/ पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) रु. ७५०/- | रु. ३००/- रु. १,०००/- | रु. ४५०/-


 

 

 

 

सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण ९,१७१ पदांच्या भरती सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका

राज्यातील प्राध्यापक भरतीसाठीही सातत्याने संघर्ष केला आहे. विविध आंदोलने, निवेदने, मंत्री व लोकप्रतिनिधींच्या भेटी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चांच्या माध्यमातून समितीने सहाय्यक प्राध्यापकांच्या एकूण ९,१७१ पदांच्या भरती सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.