Donate
Recent actvity

सत्याग्रह आंदोलन -9

सत्याग्रह आंदोलन -७ नेट -सेट,पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने दिनांक १ मार्च २०२५ पासून बेमुदत आझाद मैदान येथे आंदोलन

सत्याग्रह आंदोलन -७* नेट -सेट,पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या वतीने दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०२५ रोजी संचालक, (उच्च शिक्षण) पुणे यांच्या कार्यालयासमोर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शंभर टक्क

उच्चशिक्षित नेट,सेट, पीएच.डी. घेतलेल्या लाडक्या बहिणी व भाऊंचा आत्महत्येचा इशारा! 

 २५ सप्टेंबर २०२४ च्या अगोदर १००% प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढा अन्यथा दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी  आपल्या मूळ गावी म्हणजे मौजे दरे, ता. जावळी, जि.सातारा येथे  सकाळी ठीक ११:०० वाजता सामूहिक आत्म

२५ सप्टेंबर २०२४ च्या अगोदर १००% प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढा अन्यथा दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या मूळ गावी म्हणजे मौजे दरे, ता. जावळी, जि.सातारा येथे सकाळी ठीक ११:०० वाजता सामूहिक आत्म

उच्चशिक्षित नेट,सेट, पीएच.डी. घेतलेल्या लाडक्या बहिणी व भाऊंचा आत्महत्येचा इशारा!

१६ आंदोलन

16 ऑगस्ट 2024 रोजी "कुलगुरूच्या दारी बेरोजगाराची वारी" आंदोलन

नेट-सेट  पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या आंदोलनाचा शासनाने घेतला धसका. येता काळात ४४३५ प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढण्याचे दिले आश्वासन.

लोक्रतिनिधींना निवेदन देणे सुरू

संघर्ष समितीचे प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरू.. पुणे येथील संचालक ( उच्च शिक्षण ) यांच्या कार्यालयासमोर नेट- सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील अकृषी विद्यापीठे

🛑 100 टक्के प्राध्यापक भरतीसाठी संघर्ष समिती आक्रमक🛑

आंदोलनाचा दिवस 2 रा... आता आर या पार ची लढाई.... 100 % प्राध्यापक भरती शिवाय आता माघार नाही...

नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने सीएचबी प्राध्यापकाचे शोषण थांबून १००% प्राध्यापक भरतीकरता पुणे संचालक कर्यालया समोर करणार सत्याचा आग्रह. याकरता पदाधिकाऱ्याकडून मोर्चे बांधणी सुरू

नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने पुकारलेल्या २४ जूनच्या आंदोलनाला युवक क्रांती दल यांचा पाठिंबा

नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने सीएचबी प्राध्यापकाचे शोषण थांबून १००% प्राध्यापक भरतीकरता पुणे संचालक कर्यालया समोर करणार सत्याचा आग्रह. याकरता पदाधिकाऱ्याकडून मोर्चे बांधणी सुरू

नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने सीएचबी प्राध्यापकाचे शोषण थांबून १००% प्राध्यापक भरतीकरता पुणे संचालक कर्यालया समोर करणार सत्याचा आग्रह. याकरता पदाधिकाऱ्याकडून मोर्चे बांधणी सुरू

प्रा. डॉ. परमेश्वर पोळ यांनी आर. टी. ई. मार्फत 25% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची मागणी सातत्यपूर्ण करत ती मान्य करून घेतली. यामुळे राज्यातील हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळाला

 सीएचबी प्राध्यापकाचे शोषण  थांबून १००% प्राध्यापक भरतीकरता  मा. चंद्रकांत दादा यांना निवेदन सादर

नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीने सीएचबी प्राध्यापकाचे शोषण थांबून १००% प्राध्यापक भरतीकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत समितीचे चर्चा

नेट-सेट  पीएच.डी. धारक संघर्ष समितीने सीएचबी प्राध्यापकाचे शोषण  थांबून १००% प्राध्यापक भरतीकरता  पुणे संचालक कर्यालया समोर करणार सत्याचा आग्रह. 

24 जून पासून बेमुदत सत्याग्रह  आंदोलन

24 जून पासून बेमुदत सत्याग्रह  आंदोलन

संघर्ष समिती च्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेबाबत कोर्टाने UGC ला धारेवर धरत राज्यातील प्राध्यापकांच्या एकूण रिक्त जागांचा आढावा मागवला आहे.

Latest Activity
Member
View All
Management Team
View All
Abouts Us

सन 2010 पासून उच्च शिक्षित तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्च शिक्षण घेणारे युवक - युवती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत  वस्तीगृह, खानावळी, ग्रंथालय, अभ्यासिका, शैक्षणिक शुल्क, अधिछात्रवृत्ती आदि स्थानिक स्वरूपाचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समिती या नावाने एकत्रित आले. या सर्व प्रश्नांवर निवेदने, आंदोलने, धरणे, निदर्शने, मोर्चे, प्रशासकीय बैठका इत्यादींच्या  माध्यमातून मार्ग काढण्यासाठी सातत्यपूर्ण यशस्वी प्रयत्न करण्यात आले. सदर कालावधीत विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेट, सेट, पीएच.डी करण्याबाबत एक प्रवाह जोर धरत होता. यातून नेट, सेट, पीएच.डी पात्रता धारण करणाऱ्या युवक-युवतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना त्यांना रोजगाराच्या संदर्भात भेडसावणाऱ्या प्रमुख समस्येने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी विद्यार्थी-प्राध्यापक चळवळीची पाया भरणी 'नेट, सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती' या नावाने झाली. महाराष्ट्र राज्यातील सर्व नेट, सेट, पीएच.डी पात्रता धारण करणाऱ्या पात्रताधारकांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने मूळ संघर्ष समिती च्या नावामध्ये बदल करत 'नेट, सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य' असे नामकरण करण्यात येऊन चळवळीची राज्य स्तरावर वाटचाल सुरू झाली. या चळवळीत जबाबदारी घेणाऱ्या नेट, सेट, पीएच.डी पात्रता धारकाला समन्वयक म्हणून संबोधन करण्यात येऊन राज्य स्तरावरील नेतृत्वाला राज्य समन्वयक म्हणून संबोधण्यात येऊ लागले. यातूनच पुढे कामाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने  महाविद्यालय समन्वयक , जिल्हा समन्वयक, सह-संचालक/ विभागीय समन्वयक, राज्य समन्वयक इ. पदांची निर्मिती करण्यात आली. सर्वांना समान पातळीवर काम करण्याची समान संधी मिळावी या उद्देशाने "समन्वयक" या शब्दाचे जाणीवपूर्वक उपयोजन करण्यात आले. 
      महाराष्ट्र राज्य स्तरावरील नेट, सेट, पीएच.डी धारकांच्या चळवळीची ही वाटचाल गेली दहा वर्षे अकृषी विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालायांमधील  100% प्राध्यापक भरती, शोषणयुक्त तासिका तत्व (CHB) धोरण कायमस्वरूपी हद्दपार करून समान कामासाठी समान वेतन, दरम्यानच्या कालावधीमध्ये तासिका तत्वावरील (CHB) प्राध्यापकांची मानधन वाढ, प्राध्यापक भरती मधील सामाजिक न्यायाला अनुसरून आरक्षण पद्धती इत्यादी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अविरत सुरु असलेल्या  'नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य' या चळवळीला संघटनेचे मूर्त स्वरूप येऊन कायदेशीर दर्जा प्राप्त होणे गरजेचे होते. यासाठी 21 जून 2021 रोजी पुणे येथे राज्यातील उच्चशिक्षित तरुणांच्या बेरोजगारा वरील विचार मंथनातून निर्माण झालेली संघटना म्हणजे "नेट-सेट, पीएच.डी.धारक समिती" होय. याची  डॉ. परमेश्वर पौळ, डॉ. प्रमोद तांबे, प्रा.सुरेश देवढे पाटील, डॉ. विश्वास देशमुख, डॉ. कांचन जोशी, डॉ.अमोल म्हस्के, डॉ.ईश्वर म्हसलेकर, डॉ. रमेश वाघमारे, प्रा. विकास गवई, डॉ. संतोष जाधव, डॉ.देवानंद गोरडवार, डॉ. प्रविण गोळे आदीच्या पुढाकारातून धर्मादाय आयुक्तांकडे दि. 8 ऑक्टोंबर 2021 रोजी नोंदणी करण्यात आली. 
    या समितीच्या ठरावातून नेट-सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य,  संशोधक विद्यार्थी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य,   ग्रंथपाल संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य,   शारीरिक शिक्षण संचालक संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य,  मानवी हक्क व संविधान संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, प्राध्यापक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, प्राचार्य संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, शाळा-महाविद्यालय संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य , खाजगीकरण-कंत्राटीकरण विरोधी संघर्ष  समिती महाराष्ट्र राज्य , शिक्षण बचाव संघर्ष  समिती, महाराष्ट्र राज्य या विभिन्न समित्यांची स्थापना करण्यात आली. या सर्व समित्या त्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र स्तरावर मूळ संस्था "नेट-सेट, पीएच.डी धारक समिती" च्या अंतर्गत कार्यरत राहातील. 
      महाराष्ट्र राज्य म्हणजे पुरोगामी विचारांचे आगार असून फुले - शाहू - आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव या संघटनेवर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हे ब्रीद वाक्य घेऊन संघटना महाराष्ट्र स्तरावर अविरत काम करत आहे, ही  संघटना अल्पावधीतच कायद्याला धरून शाश्वत व प्रमाणिक काम करणारी संघटना म्हणून नावारूपाला आली आहे. 
 

ध्येय:
आमच ध्येय आहे की “शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एक सहाय्यक प्रणाली बनवणे जी की शाश्वत विकासाला मदत करणे” ; ही सहाय्यक प्रणाली  व्यक्ती आणि समाजाच्या व्यापक व शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करून शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी वचनबद्धत राहील.
 

उद्दिष्टे:

  1. धोरणे, नियम, कायदे आणि कायद्यांचे पालन करण्यासाठी संपूर्ण सरकारी आणि निमसरकारी प्रशासकीय कार्य यंत्रणेला सूचित करणे.

  2. संघटना स्थापन करून घटनात्मक मार्गाने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे.

  3. संस्थात्मक सदस्यांचे सहकार्य, समन्वय, स्पर्धात्मकता आणि संघर्ष क्षमता सुधारणे.

  4. उच्च दर्जाचे शिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम प्रदान करणे.

  5. महत्त्वाच्या सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन करणे.

  6.  शाश्वत सुधारणांसाठी सर्व समुदाय आणि भागधारकांना गुंतवून ठेवणे

  7. शैक्षणिक कार्यक्रम आणि प्राध्यापकांची गुणवत्ता वाढवणे.

  8. प्रमुख क्षेत्रांमध्ये संशोधन आणि नवकल्पनांचा विस्तार करणे.

  9. आर्थिक स्थिरता आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापन साध्य करणे.

  10.  उच्च शिक्षण, विद्यार्थी हित आणि सामाजिक हिताच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे.  बेरोजगाराच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवणे.

  11.  अन्न पोषण, पिण्याचे पाणी, दारिद्रय, बेरोजगारी या जागतिक समस्या संदर्भात उपयोजना शोधणे व अंमलबजावणी  यंत्रणेला मदत करणे.

  12.  विद्यापीठ अनुदान आयोगाचे उच्च शिक्षण संदर्भातील निर्देश व परिपत्रके त्यांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा करणे.

  13. महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण संदर्भात केलेले कायदे यानुसार उच्च शिक्षणाची ध्येय धोरणे अंमलबजावण्यासाठी सहकार्य करणे.

  14.  विद्यार्थी, उच्च शिक्षित, शिक्षक आणि सामाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक हिताच्या दृष्टीने तसेच त्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहून त्याबाबत उपाययोजना करणे.

    नेट-सेट, पीएच.डी.धारक  समितीचे कार्यक्षेत्र आणि नेतृत्व यासारख्या घटकांचा विचार करता ध्येय व उद्दिष्टे पूर्ण करण्याची गती व पद्धत ही स्थल व कालपरत्वे बदलू शकतात. ही विधाने उच्च शिक्षणाच्या व्यापक कामातून समितीची अद्वितीय ओळख आणि उद्दिष्टे प्रतिबिंबित करतात. शिवाय, बदलत्या परिस्थितीत आणि विकसित गरजांशी जुळवून घेण्यासाठी समिती अनेकदा या विधानांचे पुनरावलोकन आणि अद्यायावत करते.

READ MORE
President Message

 प्रिय मित्रानो,

सप्रेम नमस्कार,

                 २०२१ मध्ये समितीची स्थापना झाल्यापासून  नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या अध्यक्ष पदाची  जबाबदारी एकमताने सर्वांच्या इच्छेनुसार माझ्याकडे आली. ही भूमिका पार पाडत असतांना अनेक चढउतार आले अनेक आव्हानांचा सामना करावा लागला; परंतु या प्रवासात आपल्यासारखे कायद्याचे पालन करणारे, शिस्तप्रिय, संयमी, प्रामाणिक, अभ्यासू, धाडसी मावळे सोबत असल्यामुळे अल्पावधीतच समितीला  या उंचीवर घेऊन येण्यास आपण यशस्वी झालो आहोत. आपण सर्वांनी साध्या-सरळ पण प्रगल्भ श्रद्धेने प्रेरित होऊन समितीला सोबत केली आणि यातूनच हे सर्व शक्य झाले याचा मला अभिमान आहे.

आपण सर्वजण देत असलेल्या मोलाच्या सहकार्याची आणि योगदानाची उतराई म्हणून कोणत्याही विपरीत परिस्थितीत समिती आपल्या जीवनातील भरभराटीची संधी मिळवण्यास आणि आपणांस आपल्या इस्पित ध्येयापर्यंत घेऊन जाण्यास कटीबद्ध आहे. नेट-सेट, पीएच.डी.  धारक संघर्ष समिती केवळ स्वप्ने पाहत नाही;  तर अविरत परिश्रम घेत ती पूर्ण करते.  आपण उन्नत समाजासाठी शाश्वत पर्यावरण, लोकोपयोगी कल्याणकारी सेवा, दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपण आपले प्रयत्न इतरांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवण्याच्या सखोल वचनबद्धतेने मार्गक्रमन करतो; परंतु  हे कार्य समिती एकटे करू शकत नाही. समितीचे यश तुमच्यासारख्या व्यक्तींच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.

जी व्यक्ती समितीची मूल्ये आणि उज्वल भविष्यासाठी समितीची दृष्टी अंगिकारतात व समजावून घेतात.  आशा सर्व माता, भगिनी, युवा वर्ग आमच्यासोबत जोडला गेल्यास आपण सामूहिक प्रभाव वाढवून समाजातील प्रश्न  कायमस्वरूपी  सोडवून समाजात अमुलाग्र बदल घडवू शकतो. 

आपण भविष्याकडे  आशावादाने  पाहतो, आपल्यासमोर येणारी आव्हाने खूप मोठी आहेत, परंतु त्यांवर मात करण्याचा आपला संकल्प देखील तेवढाच मोठा आहे.  तुमच्या सततच्या पाठिंब्याने, समितीला विश्वास आहे की, आपण असे जग निर्माण करू शकतो जिथे प्रत्येक व्यक्तीला भरभराटीची संधी मिळेल.  समितीच्या कार्यप्रणालीवर आपण विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद. असेच सहकार्य राहू द्या, आपण कल्याणकारी शाश्वत समाजाचे स्वप्न पाहतो कारण ते निर्माण करण्याची क्षमता आपल्यातच आहे. हा दृढ विश्वास ठेवून समितीचे ध्येय-उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्या कल्पनाचे व सूचनाचे स्वागत करण्यास समिती कायम तत्पर असेल.


 धन्यवाद.

                आपला

 प्रा. डॉ.परमेश्वर विश्वनाथराव पौळ,

 अध्यक्ष, नेट - सेट पीएच.डी  धारक समिती महाराष्ट्र राज्य.

Our Objectives

Social Welfare

HEALTH & RESEARCH

EDUCATION & TRAINING

Human Rights

Anti Crime

Youtube Videos
Gallery
Testimonials